`कुटुंबातील सदस्याने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केल्यास लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द`
सावध राहा । ...तर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्दच होणार
नवी दिल्ली : ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्याने अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केल्यास सदस्यत्व रद्द होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ग्रामपंचायत सदस्य जनाबाई यांनी ही याचिका दाखल केली होती.
नगरसेवकाच्या मुलांनी किंवा वडिलांनी अनधिकृत बांधकाम केले तरी नगरसेवक पद रद्द होणार आहे. यापूर्वी केवळ नगरसेवकालाच हा नियम लागू होता. नगरसेवकाच्या कुटुंबीयांचा समावेश केला नव्हता.
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकाच्या कुटुंबातील नातेवाईक यांचाही समावेश झाला आहे. त्यानुसार कारवाई होणार आहे, असे निकाल देताना स्पष्ट करण्यात आलेय. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींना सावध राहावे लागणार आहे.