Shocking Momo Video: मोमो हा प्रकार मागील काही वर्षांमध्ये भारतात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मूळचा तिबेट आणि चीनमधील हा पदार्थ आता देशातील अनेक शहरांमध्ये अगदी हात गाड्यांवरही मिळतो. मुंबई असो, दिल्ली असो किंवा इतर कोणतेही मोठे शहर असो तिथे एक ना एक मोमोचं दुकान असतेच. अर्थात आपल्याकडे पारंपारिक पद्धतीच्या मोमोजऐवजी प्रायोगिक पद्धतीच्या मोमोला तुफान मागणी आहे. मात्र अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या या पदार्थासंदर्भातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


बनियान आणि अंडरपँटमध्ये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे कोणताही पदार्थ बनवताना तो स्वच्छ असेल याची काळजी घेतली जाते. मात्र रस्त्याच्या बाजूला मिळणाऱ्या मोमोसाठीचं पीठ चक्क पायाने मळलं जात असल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली असून अनेकांनी पदार्थांच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बनियान आणि अंडरपँटवर असताना चक्क पायाने पीठ मळताना दिसतोय. एका टोपामधील पिठाच्या गोळ्याला हा व्यक्ती पायाने तुडवताना दिसत आहे. काही वेळ हे पीठ तुडवल्यानंतर तो व्यक्ती या टोपातून बाहेर येतो. 


स्थानिक संतापले


हा 22 सेकंदांचा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील जबलपूरमधला असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवार संध्याकाळपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जबलपूर जिल्ह्यातील काही नागरिकांनी थेट पोलिसांकडे यासंदर्भात लेखी तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मोमोच्या दुकानामध्ये अशापद्धतीने मळलेल्या पिठाचे मोमो विकले जातात ते जबलपूरमधील बारगी पोलीस स्टेशनजवळ आहे. या मोमोच्या दुकानाचा मालक राजस्थानी असल्याची माहिती समोर आली आहे.


1)



2)



3)



पोलिसांनी काय कारवाई केली?


लेखी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोघांना अटक केली असून या दोघांची नाव राजकुमार गोस्वामी आणि सचिन गोस्वामी अशी आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थानमधील जबलपूरचे रहिवासी आहेत. या दोघांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


आरोग्याचा प्रश्न चर्चेत


या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या बाजूला मिळणारं खाणं किती सुरक्षित आणि आरोग्यासाठी घातक असतं याबद्दलची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे.