नवी दिल्ली : बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.


जलद आणि कार्यक्षम चलन ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिटकॉईन हे चलन जगाभरात सर्वात महागडे चलन मानले जाते. ऑनलाइन गेमिंग क्विझचे पूर्ण केल्यानंतर बिटकॉइन हे चलन मिळते. वित्तीय व्यवहारांसाठी बिटकॉईन हे सर्वात जलद आणि कार्यक्षम चलन मानले जाते. दरम्यान जगभरातील कम्प्यूटर्समध्ये व्हायरस पाठवूनही खंडणी मागण्याचे काम बिटकॉइन मार्फत केले जात आहे. त्यामुळे अनेकांना याचा धोका पत्करावा लागला आहे.


बिटकॉईन अवैध चलन


काळा पैसा, हवाला घोटाळा, ड्रग्सची खरेदी, कर चुकवणे आणि अतिरेकी कारवायांमध्ये बिटकॉईनचा अतिवापर झाल्याने बिटकॉईन चलन चर्चेचा विषय झालाय. दरम्यान, तुम्ही क्रिप्टोकरंसी बिटकॉईन आणि लिटकॉईनबाबत गेल्या काही दिवसात खूपकाही ऐकलं असेल. आरबीआयने बिटकॉईन वैध नसल्याचं सांगितले आहे.