Anurag Thakur Dancing With Actor Ranveer Singh : बॉलिवूडचा नवा बादशाह म्हणून रणवीर सिंहची (Ranveer Sing) ओळख आहे. आपल्या एनर्जाटिक स्टाईलमुळे रणवीरची सर्वत्र चर्चा असते. अनेक चित्रपटात धमाकेदार एक्शनच्या जोरावर रणवीरने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, आता रणवीरला चक्क केंद्रीय मंत्र्याने टक्कर दिली आहे. केंद्रीय मंत्र्याच्या (Anurag Thakur) डान्ससमोर रणवीर देखील फिका पडल्याचं दिसून आलं.


झालं असं की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया एक्सपोमध्ये (India Expo) 'द ग्लोबल रीच ऑफ इंडियन मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री' हा कार्यक्रम दुबईमध्ये (Dubai) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Sing) यांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर इतर कलाकार आणि मंत्री उपस्थित होते. मात्र, चर्चा होती ती अनुराग ठाकूर अभिनेता रणवीर सिंह यांचीच...


आणखी वाचा - 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, VIDEO आला समोर


अनुराग ठाकूर आणि रणवीर (Ranveer Sing dance) दोघेही मंचावर उपस्थित असताना 'बाजीराव मस्तानी' या प्रसिद्ध सिनेमातील एक गाणं वाजू लागलं. गाणं वाजतंय आणि रणवीरने ताल धरला नाही, असं होणारच नाही. आपलं आवडतं गाणं ऐकून रणवीरला ही मोह आवरला आहे. त्याने थेट अनुराग ठाकूर यांचा हात धरला आणि नाचू लागला.


पाहा Ranveer आणि Anurag Thakur यांचा डान्स - 



दरम्यान, रणवीरने नाचण्याचा आग्रह केल्याने अनुराग ठाकूर यांनी देखील रणवीरसोबत ठेका धरला. मात्र, ठाकूर यांच्या एनर्जीसमोर रणवीर देखील फिका पडल्याचं पहायला मिळालं. राजकीय नेते प्रतिष्ठेमुळे अनेकदा मोकळेपणे नाचताना दिसत नाही. मात्र, अनुराग ठाकूर यांचा अनोखा अंदाज अनेकांना आवडला आहे.