मुंबई : मोदी सरकारमधील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे त्याबद्दल माहिती दिली. अंगडी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “आज माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आता ठीक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. गेल्या काही दिवसात जे माझ्याशी संपर्कात आले आहेत त्यांनी अधिकची काळजी घ्यावी. त्यांनीही क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणीही घाबरुन जाऊ नये. काही लक्षणे दिसून आली तर डॉक्टरांकडून जाऊन तपासणी करावी किंवा कोरोना विषाणूची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. 


देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंग शेखावत आणि श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही कोरोनाबाधित झाले होते.