आरक्षणामुळे दलितांवर अत्याचार होतात - रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरक्षणासंदर्भात एक मागणी केली आहे. खुल्या वर्गातील ५० टक्क्यांपैकी २५ टक्के आरक्षण आर्थिकदृष्टया मागासांना देण्यात यावं असं आठवलेंनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरक्षणासंदर्भात एक मागणी केली आहे. खुल्या वर्गातील ५० टक्क्यांपैकी २५ टक्के आरक्षण आर्थिकदृष्टया मागासांना देण्यात यावं असं आठवलेंनी म्हटलं आहे.
एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता खुल्या वर्गातील २५ टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासांना देण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केली. ही आंदोलन शांततेने पार पडली. त्यांना १६ टक्के आरक्षण हवयं आणि तेही ओबीसीमधून नकोय. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने याबाबत विचार करावा, असे म्हणत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दलितांवर होणा-या अत्याचारांमागचंही कारण एक म्हणजे आरक्षण आहे. दलितांना आरक्षण मिळतं मात्र, इतरांना आरक्षण मिळत नाही त्यामुळेही दलितांवर अत्याचार होतात असेही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.