मुंबई : उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक अनोखा विवाह झाला. (Unique marriage) या लग्नात विवाहित जोडप्यांचा 13 वर्षीय मुलगा देखील आई-वडिलांच्या विवाह मिरवणुकीत वऱ्हाडी म्हणून सहभागी झाला होता. या लग्नातील विशेषबाब म्हणजे वर 60 वर्षांचा तर वधू 55 वर्षांची होती. दरम्यान, नव्याने लग्न केलेले जोडपे लग्न न करता 20 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. लोकांच्या छळाला कंटाळून दोघांनीही गाव प्रमुखांच्या पुढाकाराने लग्न केले.


20 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उन्नावच्या मियागंज ब्लॉकमध्ये रसूलपूर रुरी गावात राहणारे नारायण रैदास (60) हे त्यांची मैत्रीण रामरती ( 55 ) यांच्याशी 20 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यांना एक मुलगा अजय (13 वर्ष) आहे. लग्न न करता एकत्र राहून गावकरी दोघांनाही टोमणे मारत असत, त्यामुळे नारायण यांना ते अपमानास्पद वाटले.


दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा घेतला निर्णय 


ग्रामस्थांच्या त्रासाला कंटाळून नारायण यांनी ग्राम प्रधान यांच्या सांगण्यावरून रामरती हिच्याशी लगीनगाठ बांधण्याचा विचार केला. त्यानंतर ग्रामस्थांसह रमेश यांनी लग्नाची सर्व तयारी करून मिरवणूक काढण्याची व्यवस्था केली आणि वधू-वरांना अर्धा डझन वाहने घेऊन ब्रम्ह देव बाबा मंदिराकडे रवाना झाली आणि गावाबाहेरील ब्रम्ह देव बाबा मंदिरात लग्नाचा सगळे विधी पूर्ण केले. त्यानंतर दोघेही त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सात फेरे घेतले.


त्याचवेळी या मिरवणुकीत ग्रामस्थांसह ग्राम प्रधान यांनी स्वत:च्या खर्चाने संपूर्ण तयारी केली आणि धूमधाम अशी मिरवणूक काढली गेली. या मिरवणुकीत डीजेवर ग्रामस्थांसह लोक थिरकलेत. ग्राम प्रधान यांनी घडवून आणलेले हे लग्न चर्चेचा विषय झाला आहे.