जीवनात सकारात्मकता आणणारी `ही` पुस्तके वाचाच
जगभरातील अनेक वाचकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
मुंबई - गेल्या अनेक काळापासून पुस्तकं माणसाला विविध गोष्टींसाठी मदत करत असतात. पुस्तकांना सर्वात उत्तम मित्र मानले जाते. कधी राजकीय, कधी मनोरंजनात्मक, कधी सामाजिक, कधी शैक्षणिक क्षेत्रातील पुस्तके माहिती पुरवत असतात. केवळ माहितीच नाही तर काही पुस्तके अशी असतात जी माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. अशी काही सर्वाधिक विकली गेलेली पुस्तके आहेत ज्यांनी जगभरातील अनेक वाचकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
हॅरी पॉटर - जे. के. रोलिंग
२००७ साली हॅरी पॉटरच्या जगभरात जवळपास ५०० मिलियन प्रती विकल्या गेल्या. ९० च्या दशकातील अनेक तरूणांनी हॅरी आणि त्याच्या मित्रांच्या साहसी गोष्टी वाचून आपलं बालपण व्यतीत केलं आहे. मैत्रीपूर्ण कथा, जिवनातील अडथळ्यांचा सामना करणं, प्रेमभंग, शौर्य, प्रतिकुल परिस्थितीचा सामना करताना तुम्ही स्वत:ला कोण आहात हे समजणे यांसारख्या अनेक गोष्टींमधून जे. के. रोलिंग यांनी अनेक लहान मुलांचे बालपण घडवले आहे. एखाद्याने दिलेली धमकी, अस्वस्थता, किशोरवयीन आयुष्यातील धोके, स्वत:शी प्रामणिक राहून तुमच्या स्वत:च्या आयुष्याचा हिरो होणे यांसारख्या अनेक गोष्टी हॅरी पॉटरच्या पुस्तकांतून अनेक मुलांनी जगल्या. आयुष्यात अनेक मोठे बदल घडवण्याऱ्या या गोष्टींनी अनेक मुलांना जीवनात सकारात्मक दिशा दाखवली असणार हे निश्चित.
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज - जे.आर.आर टोलकिन
युद्धानंतर प्रसिद्ध झालेली जे.आर.आर टोलकिन यांची आताच्या पॉप कल्चरवरील पुस्तकांच्या सिरीजच्या आतापर्यंत १५० मिलियन प्रती विकल्या गेल्या आहेत. हॅरी पॉटरमधील अनेक थीम लॉर्ड ऑफ रिंग्जमध्ये आहेत, परंतु त्यातील काही विषय अधिक प्रगल्भपणे लॉर्ड ऑफ रिंग्जमध्ये मांडण्यात आले आहेत. द लॉर्ड ऑफ द रिंग्जमधून संपूर्ण विश्वावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही असा सर्वांत महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.
ले पेटिट प्रिन्स बाय अॅन्टोनी दे सेन्ट - एक्सपरि
'ले पेटिट प्रिन्स बाय अॅन्टोनी दे सेन्ट' हे ४०च्या दशकातील पुस्तक आजही एव्हरग्रीन आहे. त्यांनी पुस्तकांतून लिहिलेले अनेक विचार जीवनावर सकारात्मक परिणाम घडवतात. एक्सपरि यांच्या पुस्तकांचे विशेष म्हणजे ते अगदी सहजपणे लहान मुलांना आयुष्यात चांगली व्यक्ती कसं व्हायचं याविषयी सांगतात. जीवनात कसे चांगले संबंध वाढवावे, पर्यावरणाची काळजी घ्यावी, स्वत:ची त्यासोबतच आपल्या भावनांची काळजी करावी, आपल्या प्रियजनांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करता त्यांना मुक्तपणे जगू द्यावे, आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये यांसारख्या अनेक गोष्टी एक्सपरि यांनी आपल्या पुस्तकातून मांडल्या आहेत. या गोष्टी लहान तसंच मोठ्यांच्याही जीवनात सकारात्मक परिणाम करत असतात.
द क्रोनिकल्स ऑफ नार्निया बाय सी.एस. ल्युईस
खास लहान मुलांसाठी असलेल्या या पुस्तकाच्या १२० मिलिहूनही अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकात एका धार्मिक कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीची गोष्ट आहे. ज्याने त्याच्या जीवनात स्वत:वरचा विश्वास गमावला होता. ल्यूईस यांच्या पुस्तकातून धार्मिक आणि अध्यात्मिक थीमवर लिखाण केले आहे. स्वत:वर असलेल्या विश्वासाची शक्ती, जबाबदारी, आपल्या कार्यांचा होणारा परिणाम, क्षमाशिलता, लवचिकता या ल्यूईस यांनी पुस्तकांत मांडलेल्या सर्व बाबींमुळे अनेकांच्या जीवनाला एक वेगळी गती, सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त झाला.
कॅरोलेट्स वेब बाय इ.बी. व्हाइट
कॅरोलेट्स वेब हे सर्वात सर्वोत्तम लिहिलेल्या पुस्तकांसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली प्रेमभंगावरील पुस्तके आजही अनेकांची लहानपणापासूनची आवडती पुस्तकं आहेत. कॅरोलेट्स वेब यांची पुस्तकं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती आहेत. त्यांची पुस्तकातून मैत्रीचं महत्त्व, चिकाटी, सहनशिलता, पुन्हा दुसऱ्यांदा मिळणारी संधी, नम्रता, कृतज्ञता, सातत्यता या जीवनात सतत पुढे जाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी शिकवतात.