Video : टोलनाक्यावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात झाले दोन तुकडे
UP Accident : उत्तर प्रदेशच्या एका टोलनाक्यावर झालेल्या अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेगात असलेली कार टोलनाक्यावर असलेल्या डिव्हाईडराला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
Accident Video : उत्तर प्रदेशच्या (UP Accident) बाराबंकीमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील (Lucknow-Sultanpur highway) एका टोल प्लाझावर वेगवान कार दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात घडला आहे. गाडीची धडक इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले तर काही भाग हवेत अनेक फूट उंच उडाले. अपघातानंतर टोलनाक्यावर एकच गोंधळ उडाला होता. मोठा आवाज झाल्यानंतर लोकांनी कारकडे धाव घेतली. टोलनाक्यावरील लोकांनी कसातरी दरवाजा तोडून गाडीतील तरुणाला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत कारमधील तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही सगळी घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV footage) कैद झाली आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एका टोल प्लाझाच्या गेटजवळ बांधलेल्या दुभाजकावर भरधाव वेगाने जाणारी कार आदळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात कार चालवत असलेल्या 20 वर्षीय आदर्शचा मृत्यू झाला. टोल प्लाझावरील सीसीटीव्हीमध्ये हा सगळा अपघाताचा थरार कैद झाला आहे. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लखनऊ-सुलतानपूर महामार्गावरील हैदरगढ टोल प्लाझा येथे भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर आदळताना दिसत आहे. कारमध्ये अडकलेल्या आदर्शला बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. टोल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर कारमधून धूर येत होता. टोलवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि गाडीला आग लागण्यापासून रोखले.
अपघातानंतर कार अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही कार लखनऊहून सुलतानपूरच्या दिशेने जात होती. अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैदरगड कोतवाली भागातील लखनऊ-सुलतानपूर महामार्गावरील बारा टोल प्लाझा येथे हा अपघात झाला आहे. कार चालक सुसाट वेगाने जात होता, त्यामुळे कारवर ताबा ठेवता आला नाही आणि पूर्ण वेगाने कार थेट टोल प्लाझा येथे दुभाजकावर जाऊन आदळली. कार डिव्हाईडला धडकताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात कारचे काही भाग हवेत उडून गेले.
हा भीषण अपघात पाहून टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. कर्मचारी सर्वजण कारजवळ धावले. तिथल्या लोकांनी कसेतरी कारचालकाला बाहेर काढले. मात्र कार चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर हैदरगड पोलिसांना माहिती देण्यात आली. कार अपघाताचा हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.