UP Assembly Election 2022 : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी आज उत्तर प्रदेशसाठी पक्षाचा जाहीरनामा (Congress Manifesto) प्रसिद्ध केला. यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन
रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत प्रियंका गांधी यांनी 20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिले आहे. हे आमचं पोकळ आश्वासन नसून काँग्रेसची संपूर्ण रणनीती असल्याचं प्रियंका गांधी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या रोजगार कसा मिळणार हे जाहीरनाम्यात लिहिले आहे. तर राहुल गांधी म्हणाले की, देश आणि यूपीची समस्या भारतातील प्रत्येक तरुणाला माहीत आहे. आम्ही यूपीच्या तरुणांशी बोलून त्यांची मते मांडली आहेत.


काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा
- 20 लाख सरकारी नोकऱ्यांची हमी
- 8 लाख महिलांना सरकारी नोकऱ्या
- परीक्षा देणाऱ्यांसाठी मोफत बस आणि रेल्वे प्रवास
- शिक्षकांची 1.50 लाख रिक्त पदे भरण्यात येणार 


यूपीमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका 
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यूपीमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागा, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागा आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर मतदान होणार