लखनऊ : उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचं  (UP Assembly Elections 2022)  वातावरण तापलं आहे. आज उत्तर प्रेदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. 9 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान सुरु आहे. याचदरम्यान लखनऊमधील एक सीट तुफान चर्चेत आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान लिंबू साडीतील एका महिलेचा फोटो तुफान व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 साली निवडणुकी दरम्यान लिंबू साडीतील ज्या  महिलेचे फोटो व्हायरल झाले होते, त्यांचं नाव रीना द्विवेदी असं आहे. 



उत्तर प्रदेशच्या देवरिया ठिकाणी राहणाऱ्या रीना द्विवेदी यांची यंदा लखनऊच्या मोहनलालगंज विधानसभेच्या गोसाईगंज येथे निवडणूक ड्यूटी लावण्यात आली आहे. 


पण 2019 पासून ते 2022 पर्यंत त्यांचा अंदाज पूर्णपणे बदलला आहे. आता विधानसभा निवडणुकी दरम्यान रीना वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसल्या. 



दरम्यान त्या म्हणाल्या, 'गेल्या वेळेस मी लिंबू रंगाची साडी नेसली होती. यावेळी थोडा बदल केला आहे. वेळेनुसार कपड्यांमध्ये बदल होणं फार गरजेचं असल्याचं देखील त्या म्हणाल्या..



रीना द्विवेदी यांनी 'बिग बॉस'च्या पुढील भगात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'माझं संपूर्ण कुटुंब माझ्या पाठी कायम खंबीर पणे उभं राहिलं आहे, मला मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे ते आनंदी आहेत. जर टीव्ही क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर 'बिग बॉस'मध्ये काम करायला आवडेल.' असं त्या 2019 साली म्हणाल्या होत्या.