लखनऊ : यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly election) राजकीय वातावरण आता तापत आहे. सरकार आणि संघटनेत फेरबदलाच्या प्रयत्नादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी दिल्लीला पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर एनडीएचा मित्र पक्ष अपना दलच्या अध्यक्षा आणि माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुपिया पटेल (Anupriya patel) यांनीही अमित शहा यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुप्रिया यांना केंद्रात मंत्री करण्याची शक्यता


अनुप्रिया पटेल यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत युपी निवडणुका, युती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अनुप्रिया पटेल यांना केंद्रात मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.


अनुपिया पटेल याआधी म्हणाल्या होत्या की, यूपीच्या मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाला आणखी वाटा मिळायल्या हव्यात. यूपी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि दोन लोकांना मंत्री करावे. सध्या यूपीच्या मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाचे 1 राज्यमंत्री आहेत. 


मुख्यमंत्री योगींनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट


वास्तविक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी (Yogi aadityanath) आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतील. योगींच्या भाजपच्या बड्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी रणनीती बनविली जाईल, असे सांगितले जात आहे. यासह, यूपी संघटना आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होऊ शकते.


पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये मंथन सुरू आहे. योगी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि उत्तर प्रदेश भाजप संघटनेत बदल झाल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत सीएम योगी आणि अनुप्रिया पटेल यांची अमित शहा यांच्याशी दिल्लीत होणारी भेट अनेक मार्गांनी खास आहे.