उत्तर प्रदेश : पैसा, दागिण्यांसाठी विवाहीत जोडप्यांचा `सरकारी लग्ना`चा डबल धमाका
योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समजताच सरकार घडबडून जागे झाले आहे. सरकारने चौकशी सुरू केली असून, सत्यता तपासून सरकारने काही जोडप्यांकडे दिलेली रक्कम आणि भेटवस्तू परत घेतल्या आहेत. तर, काही ठिकाणी वसूली सुरू आहे.
ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशात विवाहीत जोडप्यांनी दागिणे आणि पैशांच्या हव्यासापोठी 'सरकारी लग्ना'चा डबल बार उडवून दिला आहे. या डबल बारचा परिणाम थेट मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेत मोटा घोटाळा होण्यात झाल्याचे पुढे आले आहे.
बापाच्या लग्नात पोरांचा नाच
मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजना ही गरीब मुलींचा विवाह व्हावा यासाठी सुरू करण्यात आली. विवाह करणाऱ्या जोडप्याला २० हजार रूपये रोख, ज्वेलरी आणि भेटवस्तू असे या योजनेचे स्वरूप आहे. मात्र, पैसे आणि दागिण्यांच्या अमिशाने विवाहीत जोडप्यांनीही सरकारी लग्न करत डबल बार उडवून दिल्याने योजनेचा चांगलाच फज्जा उडला आहे. विशेष असे की, सरकारी लग्नाचा डबल बार उडवणाऱ्या अनेक जोडप्यांच्या लग्नात त्यांच्या पोराबाळांचाही समावेश आहे.
नवभारत टाईम्सने स्टींग ऑपरेशन केल्याचा दावा करून दिलेल्या वृत्तानुसार, २४ फेब्रुवारीला ग्रेटर नोएडा येथील वायएमसीए क्लबमध्ये ६६ जोडप्यांनी सामुहिक विवाह केला. या जोडपप्यांच्या सत्यतेबाबत माहिती घेतली असता धक्कादायक वास्त पुढे आले. सरकारी लग्न केलेल्या जोडप्यांपैकी तब्बल ११ जोडप्यांनी लग्नाचा बनाव रचत नकली विवाह केला. त्यातील एक महाभाग तर ग्रेटर नोएडात बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला असून, त्याला दोन मुलेही आहेत. तर, तिसऱ्या मुलीचे लग्न झाले आहे. त्याच्या मूळ लग्नाला ६ वर्षे उलटून गेली आहेत.
काय आहे योजना?
- या योजनेँतर्गत सरकार २५० कोटी रूपयांचा निधी समाज कल्याण विभागाला देते.
- आतापर्यंत ५५ जिल्ह्यांमध्ये ५,९३७ जोडप्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
- दरम्यान, यूपी सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षात १० हजार विवाहांचे लक्ष्य ठेवले आहे.
- २० जिल्ह्यांमध्ये सरकारने येत्या काही काळात विवाहांचे आयोजन केल्याचे समजते.
दरम्यान, योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समजताच सरकार घडबडून जागे झाले आहे. सरकारने चौकशी सुरू केली असून, सत्यता तपासून सरकारने काही जोडप्यांकडे दिलेली रक्कम आणि भेटवस्तू परत घेतल्या आहेत. तर, काही ठिकाणी वसूली सुरू आहे.