Senior Student Blackmailing Girls : एका होमियोपॅथिक कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना ब्लॅकमेलिंक (Blackmailing) केलं जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार कॉलेजमधलेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करत होत्या. पीडित विद्यार्थिनींनी याप्रकरणी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून आरोपी विद्यार्थ्यांना सहा मिहन्यांसाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमका प्रकार?
उत्तर प्रदेशमधल्या राजकीय होमियोपॅथिक कॉलेजमध्ये ही घटना आहे. कॉलेजमधील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी मोहम्मद आमिर आपल्या मैत्रीणीच्या माध्यमातून इतर विद्यार्थिनींचे आपत्तीजनक फोटो (obscene pirctures) आणि व्हिडिओ बनवायचा. त्यानंतर त्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यतातून तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजच्या (Homoeopathic Medical College) पहिल्या वर्षातील विद्यार्थीनी आरोपी मोहम्मद आमिरची मैत्रीण आहे. ही विद्यार्थिनी कॉलेजमधल्या इतर मुलींचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ लपूनछपून मोबाईलमध्ये शूट करायची. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ ती आरोपील आमीर मोबाईलवर पाठवायची. 


खासगी वसतीगृहातील प्रकार
आरोपी विद्यार्थिनी ही खासगी वसतीगृहात राहात होती. बीएचएमएसच्य पहिल्या वर्षात ती शिकत होती. वसतीगृहातील मुली आंघोळीला गेल्या असतील किंवा कपडे बदलाना आरोपी विद्यार्थिनी लपून मोबाईलमध्ये शूट करायची आणि ते व्हिडिओ ती आमीर पाठवायची. त्यानंतर आरोपी आमीर त्या मुलींना गाठायचा आणि त्यांना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना  ब्लॅकमेलिंग करायचा. याप्रकरणी काही मुलींनी हिम्मत दाखवत या प्रकाराची माहिती कॉलेजच्या प्राध्यापकांना दिली. 


प्राध्यापकांनी तात्काळ आरोपी मोहम्मद आमीर आणि आरोपी विद्यार्थिनीचे मोबाईल जप्त केले. त्यांच्या मोबाईलमध्ये वसतीगृहातील अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. तसंच आमिरकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचंही काही विद्यार्थिनींचा तपासात समोर आलं. प्राध्यापाकांनी दोघांच्याही मोबाईलमधले सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले. त्यानंतर दोघांनाही कॉलेजमधून सहा महिन्यांसाठ निलंबित केलं. 


दरम्यान, प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता गाझीपूर पोलीस स्थानकातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद आमिर आणि आरोपी विद्यार्थिनिला ताब्यात घेतलं आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पावठवण्यात आले आहेत. या दोघांनी मिळून किती मुलींना ब्लॅकमेल केलं आहे याचा तपासही पोलीस करत आहेत.