Father Raped 16 year old Daughter: मुलीचं 16 वर्षाचं वय म्हणजे बालपण संपून आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याचं, माणसं ओळखण्याचं.. या वयात लेकीला आपल्या बापाचा खांदा आणि अनुभव खूप आधार देत असतो. पण एका घटनेत निष्पाप मुलीच्या बापाचा खांदा मगरमिठी कधी बनला हे तिलाच कळालं नाही. नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीला वासनेचे शिकार बनवले. धक्कादायक म्हणजे ती गर्भवती राहिल्यानंतर घरच्यांना मोठा धक्का बसला आणि मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील बरेली येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलगी गर्भवती असल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. पीडितेने तिच्या मोठ्या बहिणीसह पोलीस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरून बारादरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जन्मदात्या बापाकडून बरेच दिवस हे अमानवी कृत्य सुरू होते. पीडित मुलीची आई तिच्या आजीच्या घरी राहते. ती आणि तिची मोठी बहीण त्यांच्या वडिलांसोबत घरी राहतात. वडील अनेक दिवसांपासून मुलीचा विनयभंग आणि शारीरिक अत्याचार करत होते. याबाबत घरच्यांना सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही, असे पीडित मुलगी सांगते. 


मुलीवर अनेकवेळा बलात्कार


काही महिन्यांपूर्वी मी पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली होती, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर वडिलांचे मनोबल वाढले, असे पीडित मुलीचे म्हणणे आहे. कलयुगी बापाने मर्यादा ओलांडल्याचा तिचा आरोप आहे. नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी वडिलांनी दिली. यामुळे आपण गप्प राहिल्याचेही तिने सांगितले.


बापाच्या वारंवार अत्याचारानंतर मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार मोठ्या बहिणीला समजल्यानंतर तिने बापाला मारहाण केली. यानंतर तो घाबरला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मोठ्या बहिणीने त्याला पोलीस ठाण्यात नेले. 


मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अहवाल लिहिला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी आणि जबाब न्यायालयात घेण्यात येणार आहे. सध्या आरोपी फरार झाला असून त्याला अटक करण्यात येईल, असे बारादरी पोलिस निरीक्षक हिमांशू निगम यांनी सांगितले.