Crime News : मित्रांनी दारु प्यायची पैज लावली अन् केसाने गळा कापला...
Crime News : जयसिंग त्या दिवशी 60 हजार रुपये घेऊन घरातून निघाला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. यानंतर तो बेशुद्ध असल्याचे आम्हाला कळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली
Crime News : मैत्रीमध्ये अनेकदा आपण पैज लावतो आणि ती जिंकल्यावर एखाद्याला त्याचं बक्षिसही मिळतं. पण उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्र्यामध्ये तीन मित्रांनी अशी पैज लावली की त्यामध्ये एकाचा जीव (Crime News) गेला. मात्र यानंतरही त्याच्या मित्रांना केलेल्या कृत्याने मैत्रीच्या नात्याला कलंक लागला आहे. दारू (alcohol) पिण्याच्या पैजेने जयसिंग नावाच्या व्यक्तीचा जीव घेतला आहे. जयसिंगच्या दोन मित्रांनी त्याला 10 मिनिटांत तीन क्वार्टर दारू पिण्याचे चॅलेंज दिले होते. पैजेनुसार, जयसिंगला 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू प्यायची होती. जयसिंगने ती पूर्ण केली मात्र त्याला जीव गमवावा लागला.
45 वर्षीय जयसिंग ताजगंज परिसरातील धंधुपुरा गावात राहत होता. मात्र एका अटीमुळे जयसिंगला जीव गमवावा लागला. जयसिंगने 10 मिनिटांत एकामागून एक 3 क्वार्टर दारू पिऊन पैज जिंकली, पण त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. जयसिंग बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र जयसिंग याचा रुग्णालयात मृत्यू झाला. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जयसिंगचे मित्र भोला आणि केशव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच दोन्ही मित्रांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. जयसिंगच्या मित्रांनी त्याच्या खिशातून सर्व पैसे घेऊन पळ काढला होता.
"जयसिंग त्या दिवशी 60 हजार रुपये घेऊन घरातून निघाला होता. त्याला त्याच्या ई-रिक्षाचा हप्ता जमा करायचा होता. संध्याकाळी शिल्पग्रामजवळ जयसिंग बेशुद्धावस्थेत पडल्याची बातमी आम्हाला ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाली. त्याला भोला आणि केशव यांनी दारू पाजली होती. आम्ही त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले," असे मृताचा भाऊ सुखवीर सिंग याने पोलिसांना सांगितले.
मोठ्या भावाने दोन्ही मित्रांविरुद्ध ताजगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ते पैसे चोरण्याच्या उद्देशाने जयसिंगच्या मित्रांनी त्याच्यासमोर एक भन्नाट अट घातली आणि त्याला दारू प्यायला लावल्याचा आरोप आहे. दारू पिऊनच जयसिंगची प्रकृती बिघडली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मृताच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे.