UP Crime News: मुलींना लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याच्या घटना आपण रोज वाचत असतो. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला नियमानुसार शिक्षा होते. पण तोपर्यंत पीडित मुलीचे आयुष्य बरबाद झालेले असते. समाज आपल्याला सामावून घेईल का? अशी भीती पीडितेच्या मनात असते. दरम्यान बलात्काराच्या एका घटनेत पीडितेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ती आपल्या निर्णयावर ठाम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरौली जिल्ह्यातील एका गावात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. यानंतर ज्याने आपल्यावर बलात्कार केला त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय पीडित तरुणीने घेतला आहे. यासाठी ती दोन दिवसांपासून त्याच्या दारात उपोषणाला बसली आहे. तरुणीला दारात बसलेले पाहून आता तरुणाच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून पळ काढला आहे. दरम्यान पोलीस मात्र अशी कोणतीही घटना घडल्याचे नाकारत आहेत. 
 
सुरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी तरुणी शेजारच्या गावातील तरुणाच्या प्रेमात पडली. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यांपूर्वी तरुणीने दबाव आणला असता तरुणाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी तरुणीने गुन्हा दाखल केल्याने आरोपी तरुणाला तुरुंगात जावे लागले.
 
तरुण तुरुंगात गेल्यानंतर तरुणीने त्या तरुणाशी लग्नाची आशा सोडली नाही आणि लग्नाचा प्रस्ताव घेऊन तुरुंगात पोहोचली. पण तिथेही तो राजी झाला नाही. आता तर तिच्या नातेवाईकांनीही तिला ठेवण्यास नकार दिल्याचे मुलीचे म्हणणे आहे. 


अशा स्थितीत पीडित तरुणाच्या दारात पोहोचल्याने तरुणी आता उपोषणाला बसली आहे. जर त्याने माझ्याशी लग्न केले नाही तर मी उपाशी मरेल, असे तिने सांगितले. पोलिस ठाण्याचे अध्यक्ष नवीन चौधरी यांनी ही घटनेला दुजोरा दिला नाही. मुलीने मला याची माहिती द्यायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.