धक्कादायक : डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी कापलेला पाय ठेवला दोन्ही पायांमध्ये
काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी झांसीमध्ये पाय तुटलेल्या रूग्णाचा पाय त्याला उशी म्हणून डोक्या खाली ठेवायला दिला. या घटनेबाबत सगळ्याच स्तरातून विरोध करण्यात आला. आता असाच एक प्रकार सुल्तानपुरमध्ये घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रेल्वे अपघातात पाय तुटलेल्या तरूणावर उपचार करण्याऐवजी कापला गेलेला पाय दोन्ही पायांच्यामध्ये ठेवून दिला.
सुल्तानपूर : काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी झांसीमध्ये पाय तुटलेल्या रूग्णाचा पाय त्याला उशी म्हणून डोक्या खाली ठेवायला दिला. या घटनेबाबत सगळ्याच स्तरातून विरोध करण्यात आला. आता असाच एक प्रकार सुल्तानपुरमध्ये घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रेल्वे अपघातात पाय तुटलेल्या तरूणावर उपचार करण्याऐवजी कापला गेलेला पाय दोन्ही पायांच्यामध्ये ठेवून दिला.
तरूण त्रासाने रडत होता मात्र अधिकाऱ्यांनी अशी कोणतीच घटना घडली नाही असं म्हटलं आहे. मात्र ही घटना मीडियासमोर आल्यावर अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.
रेल्वे अपघातात पाय कापला गेला
जयसिंहपुर ठाण्यातील रावनिया येथे राहणाऱ्या अतुल कुमार पांडेय याचा बुधवारी रात्री उशिरा रेल्वे अपघातात पाय कापला गेला. त्यानंतर या अपघातानंतर त्याला रूग्णालयात दाखल केले गेले. आणि तेथील डॉक्टरांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं.
डॉक्टरांकडून हलगर्जीपणा
तरूणाचा अपघातात पाय कापला गेल्यानंतर डॉक्टरांनी दाखवलेला निष्काळजीपणा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. डॉक्टरांनी त्याचा कापलेला पाय दोन्ही पायांच्यामध्ये तसाच ठेवून दिला. त्यानंतर तेथील लोकांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉक्टरांनी त्यावर पँट ठेवली. मात्र त्यानंतर त्याला लखनऊमध्ये पाठवण्यात आले.