रामराजे शिंदे, झी २४ तास, हस्तिनापूर : कौरवांची राजधानी हस्तिनापूर. ज्या हस्तिनापूरात द्युत खेळला गेला. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. तिथे यंदा मतांचा जबरदस्त जुगार खेळला जाणार आहे. हस्तिनापुरातल्या या युद्धात काँग्रेसनं उतरवलंय अर्चना गौतमला. मिस इंडिया बिकीनी ठरलेल्या अर्चनाची राजकारणात एन्ट्री होईल ती हस्तिनापूरातल्या खेळानं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लडकी हूं, लड सकती हूं, हा नारा घेऊन अर्चना हस्तिनापूरच्या युद्धभूमीत उतरली आहे. प्रियंका गांधी यांच्यापासून प्रेरणा घेत राजकारणात आल्याचं अर्चना गौतम सांगते. भाजपचे विद्यमान आमदार दिनेश खटिक, काँग्रेसची अर्चना गौतम आणि सपाचे योगेश वर्मा अशी तिरंगी लढत हस्तिनापूरमध्ये होईल.


अर्चना गौतमला उतरवणं ही काँग्रेसची चीप पब्लिसिटी असल्याचाही आरोप भाजपनं केलाय. तर, एका अभिनेत्रीला राजकारणात येण्याची संधी म्हणून काँग्रेस अर्चनाच्या उमेदवारीचं समर्थन करतंय.


हस्तिनापूरचं वैशिष्ट्य म्हणजे जो हस्तिनापूरचा आमदार होतो, त्याच पक्षाची सत्ता उत्तरप्रदेशमध्ये येते. त्यामुळे हस्तिनापूर नगरीतलं युद्ध किती आक्रमक आणि रंगतदार होणार, याची ही झाँकी आहे. पिक्चर अभी बाकी है.


कोण आहे अर्चना गौतम?
- अर्चना गौतम मास कम्युनिकेशनमध्ये पदवीधर आहे 
- २०१४ मध्ये मिस युपी
- २०१८ मध्ये ती मिस बिकीनी इंडिया ठरलीय