उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये केंद्रीय वस्तू सेवा कर पथकाने गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. या छाप्यात गुटखा व्यापाऱ्याकडून 6 कोटी 31 लाख 11 हजार आठशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे पैसे गुटखा व्यापाऱ्याने आपल्या बेडमध्ये लपवून ठेवले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैशांची मोजणी करण्यासाठी स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना तीन मशिन आणि मोठ मोठ्या ट्रंक आणाव्या लागल्या. तब्बल 18 तासांनंतर ट्रंकमध्ये भरून रक्कम घेऊन जाण्यात आली. 


नेमकं काय आहे प्रकरण?
सुमेरपूर शहरातील पोलीस ठाण्याजवळ राहणाऱ्या गुटखा व्यापारी जगत गुप्ता यांच्या घरावर केंद्रीय वस्तू सेवा कर पथकाने छापा टाकला. 15 सदस्यीय पथकाने 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता सुरू केलेला हा छापा 13 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सुरू होता. रात्री उशिरापर्यंत तीन मोठ्या ट्रंक पैशांनी भरल्या होत्या.


पैसे भरून ट्रंक स्टेट बँक हमीरपूर इथं पाठवण्यात आल्या. गुटखा व्यापाऱ्याने जीएसटी कागपत्रात हेराफेरी केल्याचा आरोप आहे.