नवरात्रीत माता शक्तीचं रौद्र रुप! पहिल्यांदा महिला पोलिसांनी केला गुंडांचा एनकाऊंटर
Encounter Ladies Police : उत्ततर प्रदेश महिला पोलिसांनी गुंडाचा एनकाऊंटर करत इतिहास रचला आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशी पहिलीच घटना आहे. या घटनेची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.
UP Ladies Police Encounter: नवरात्रीत कालीमातेचं रौद्र रुप पाहिला मिळालंय. उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलिसांनी (Ladies Police) एका गुंडाचा एनकाऊंटर केला. महिला पोलिसांनकडून एनकाऊंटरची ही देशातली पहिली घटना आहे. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बरवाट्टी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी आपल्या 4 महिला पोलिसांसह चकमकीत सहभागी झाल्या होत्या. आरोपी इमामुलला कुख्यात गुंड असूून त्याला पकडण्यासाठी इनाम जारी करण्यात आलं होतं. इमामुलला अटक करण्यासाठी महिला पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि त्याला अटक केली. यादरम्यान इमामुलने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून महिला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इमामुलच्या पायाला गोळी लागली.
महिला पोलीस पहिल्यांचा चकमकीत
अटक करण्यात आलेल्या आरोपी इमामुलवर कुशीनगर आणि संतकबीर नगरमध्ये डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. इमामुल मेंहदीगंज इथल्या अमडरिया नहर इथं येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर बरवाट्टी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी आपल्या 4 महिला पोलिसांसह तिथ पोहेचल्या. पोलिसांना पाहाताच इमामुलने त्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. पण महिला पोलीस मागे हटल्या नाहीत. प्रत्युत्तरात महिला पोलिसांनीही गोळीबार केला. त्यानंतर मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. नवरातौत्सवात महिला पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कामगिरीची देशभरात चर्चा सुरु आहे.
उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलीस पहिल्यांदा एखाद्या चकमकीत सहभागी झाल्या होत्या. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना मोठं यश मिळालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इमामुलकडून अवैध देशी कट्टा, जिवंत काडतुसं आणि एक बाईक जप्त करण्यात आली. अटक केल्यानंतर इमामुलला तुरुंगात टाकण्यात आलं. आरोपी इमामुल हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता, जनावरांच्या तस्करीत त्यााच हात होता. गेल्या अनेक काळापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पण जे कोणालाच जमलं नाही ते महिला पोलिसांनी करुन दाखवलं.
महिला पोलिसांचा होणार सन्मान
उत्तर प्रदेश महिला पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. पोलीस विभागातर्फे चकमकीत सहभागी झालेल्या महिला पोलिसांचा सन्मान केला जाणार आहे. ADG अखिल कुमार महिला पोलिसांना प्रशस्तीपत्रकही देणार आहेत.
आरोपीचा एनकाऊंटर
त्याआधी उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी महिला कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिासंनी चकमकीत ठार केलं. अयोध्येतल्या पूर कलंदरमध्ये आरोपी अनीस आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनीस मारला गेला. तर अनीसचे इतर साथीदारांना अटक करणअयात आली आहे. आरोपी अनीसने महिला कॉन्सेटबलची छेड काढली होती, याचा जाब विचारला म्हणून अनीस आणि त्याच्या साथीरांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.