पालिका निवडणूक : अमेठीत काँग्रेसची पीछेहाट, भाजपची मुसंडी
उत्तर प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत विजय मिळवलाय. दरम्यान, अमेठी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झालेय. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना हा धोक्याचा इशारा मिळालाय.
लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत विजय मिळवलाय. दरम्यान, अमेठी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झालेय. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना हा धोक्याचा इशारा मिळालाय.
१४ ठिकाणी भाजपचा महापौर
उत्तर प्रदेशातील १६ महापालिकांपैकी तब्बल १४ ठिकाणी भाजपचा महापौर विराजमान होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. त्याशिवाय १९८ नगरपालिका आणि ४३८ नगर पंचायतींमध्येही भाजपनं जोरदार विजयम मिळवलाय.
अमेठी भाजपकडे
अमेठी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली असून, भाजपचा नगराध्यक्ष विजयी झालाय. तर अयोध्येत पहिल्यांदाच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर विजयी झालाय.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजपनं आपली विजयी घोडदौड कायम राखलीय. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करिश्मा कायम असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.