लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


अॅक्शनमध्ये यूपी पोलीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपी पोलीस सध्ये पूर्ण अॅक्शनमध्ये दिसत आहे. एका मागे एक ऐन्काउंटर होत आहेत. यूपीमध्ये शनिवारी रात्री पुन्हा एन्काउंटर करण्यात आलं. राजधानी दिल्ली जवळ असलेल्या गाजियाबादमध्ये तीन एनकाउंटर करण्यात आले ज्यामध्ये 4 गुंडाना गोळी लागली. 3 पोलीस देखील यामध्ये जखमी झाले आहेत. हा एनकाउंटर गाजियाबादच्या मसूरी, साहनीगेट आणि विजयनगरमध्ये झाला. एनकाउंटरमध्ये 50 हजार बक्षीस असलेल्या गुंडाला देखील ठार करण्यात आलं. मुकीम हा काला गँगचा सक्रिय सदस्य होता.


48 तासात 15 एनकांउटर 


सहारनपूरमध्ये पोलिसांनी एनकांउटरमध्ये 10 हजार बक्षीस असलेल्या गुंडाला अटक केली आहे. यामध्ये एक पोलीस जखमी झाला. मथुरामध्ये पोलिसांनी 3 गुंडांना अटक केली. येथे देखील एका पोलिसाला गोळी लागली.


मागील 48 तासांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये 15 एनकांउटर झाले. यामध्ये तीन गुंड मारले गेले. तर 36 गुंडांना अटक करण्यात आली आहे. मागील 3 दिवसात पोलिसांनी एनकांउटरचा धडाका लावला आहे.