Upcoming IPOs 2023: येत्या वर्षात नवनवे आयपीओही (IPO) खुले होणार आहेत. यंदाच्या वर्षी आपल्याला अनेक कठीण आर्थिक प्रसंगांनाही सामोरे जावे लागले आहे. त्यातून आर्थिक मंदीचंही सावट आपल्यावर आहे. त्यातून दिवसेंदिवस महागाईही (Inflation) वाढते आहे अशा परिस्थिती आपल्याला शेअर मार्केटचा पर्यायही खुला असताना तिथेही अनेक मोठे बदल आपण पाहत आहोत. शेअर मार्केटमध्येही अनेक चढउतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आपलंही शेअर मार्केटवर बारिक लक्ष आहेच. यंदाही तुम्हाला तुमचं असंच बारिक लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण सरत्या वर्षाला निरोप देता देता आपण नव्या आर्थिक वर्षात पदार्पण करणार आहे. लवकरच आपले बजेटही सादर होणार आहे. तेव्हा येत्या 2023 वर्षात आपल्याला शेअर मार्केट, स्टॉक्स आणि आयपीओ अशा महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवायचे आहे. तेव्हा येत्या वर्षी येणारे टॉप आयपीओ जाणून घेऊया या लेखातून. 


येत्या वर्षात कोणकोणते आयपीओज येतील? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. येत्या वर्षात अनेक मोठमोठ्या कंपनींचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कंपन्या आयपीओत येण्याची शक्यता आहे. सर्वाइवल टेक्ननोलॉजीज नावाची एक कंपनी येत्या काळात लवकरच आपला नवा आयपीओ आणण्याच्या विचारात असून या कंपनीनं सेबीकडे आपल्या आयपीओसाठी (IPO Issue) अर्ज केला आहे. या आपल्या आयपीओ योजनेतून ही कंपनी 1000 कोटी रूपये उभे करण्याच्या विचारात आहे. यासाठी ही कंपनी लवकरच 200 कोटी रूपयांचा फ्रेश आयपीओ आणणार आहे. तर 800 कोटी रूपये OFS मध्ये जातील. 


2. ब्यूटी आणि कॉस्मॅटिक क्षेत्रातील कंपनी मामाअर्थची (Mama Earth) पेरेंट कंपनी होनासा कन्झुमर लिमिटेड ही कंपनीही 400 कोटी रूपयांचा फ्रेश आयपीओ आणणार आहे. ही कंपनी 10 रूपये पर इक्विटी शेअरचे फंड उभे करण्याच्या विचारात आहे. 


3. पुराणिक बिल्डर्स सुद्धा येत्या काळात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात ते 510 कोटी रूपयांचा फ्रेश इशू आणणार आहेत तसेच त्यात त्यांचा ऑफर फॉर सेलही असेल. ही कंपनी रियल इस्टेटमधील लोकप्रिय कंपनी आहे. 


4. ओव्हायओ(OYO) रूम्स येत्या वर्षी आपला भला मोठ्ठा आयपीओ आणणार असल्याची चर्चा आहे. मागच्या दोन महिन्यापासून ही चर्चा सुरू आहे. या कंपनीन या आर्थिक वर्षात नेट लॉस अनुभवला आहे. या कंपनी तीनशे पेक्षा जास्त कोटींचे नुकसान झाले होते परंतु ही कंपनी नव्यानं आयपीओ आणण्याच्या तयारीत दिसते आहे. 


5. याशिवाय ओला कॅब्स (Ola Cabs), स्विगी, गो फर्स्ट, बायजू (Byju) सारख्या कंपन्या सुद्धा बाजारात येणार असल्याच्या चर्चा आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)