लोकसभा निवडणुकीआधी भाजपला आणखी एक धक्का बसणार?
भाजपला आणखी एक धक्का?
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला आणखी एक धक्का लागण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये जागावाटपावरुन बिहारमध्ये घटकपक्षामध्ये वाद सुरु आहे. आरएलएसपी आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन अजूनही मतभेद आहेत. यातच उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, भाजप अध्यक्ष यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण मला वेळ नाही दिला गेला.
आज पटनामध्ये उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आरएलएसपीची बैठक होत आहे. या बैठकीत कुशवाह मोठा निर्णय जाहीर करु शकतात. उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, नितीश कुमार यांच्याकडून अपमान केला गेल्यानंतर याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
याआधी कुशवाहा दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांनी अमित शाहा यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं होतं. पण अमित शाहा यांना त्यांना भेटीची वेळच नाही दिली. प्रवक्ते माधव आनंद यांना म्हटलं की, अमित शाहा हे सध्या व्यस्त आहेत. ते सध्या दिल्लीच्या बाहेर आहेत.
अमित शाह यांनी भेटीची वेळ न दिल्याने तेजस्वी यादव यांनी रालोसपाचे प्रमुख यांना फोन करुन भेटीची इच्छा वर्तवली. पण त्यांनी तेजस्वी यादव यांना व्यस्त असल्याचं कारण देत भेट नाकारली होती. पण दिल्लीला जाऊन शाह यांनी भेट नाकारली. त्यांना भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन परतावं लागलं.
मागील महिन्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषणा केली होती की, बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांनी याआधीच जाहीर केलं आहे की ते समान जागेवर आगामी निवडणुका लढवणार आहेत. या घोषणेनंतर उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षात एकच खळबळ उडाली.
सूत्रांच्या माहितीनुसार उपेंद्र कुशवाहा यांना लोकसभेच्या 3 जागा हव्या आहेत. पण भाजप त्यांना 2 जागा देण्याचा विचार करत आहे. यामुळे कुशवाहा नाराज आहेत. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल अपशब्द वापरल्याचा मुद्दा उचलत त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे कुशवाहा आता एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा करतात का याबाबत बिहारमध्ये चर्चा होत आहे.