मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समितीचे (MPC) चौथे द्विमासिक चलनविषयक धोरण सादर केले. बैठकीचा निकाल जाहीर करताना शक्तिकांत दास यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याची घोषणा केली. रेपो दर 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. एमपीसीने आपली अनुकूल भूमिका कायम ठेवली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये (वर्ष 2020) आरबीआयने रेपो दरात 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो दर ४ टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता.


डिजिटल पेमेंट महाग होऊ शकतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटबद्दल मोठी माहिती दिली. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत चर्चा होत आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, येत्या काळात आपल्या सर्वांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.


देशात झपाट्याने डिजिटल पेमेंट वाढत आहे


2016 मध्ये नोटाबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंट झपाट्याने वाढले. कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात देशातील डिजिटल पेमेंटचा आलेख उच्च पातळीवर पोहोचला आहे. संसर्ग टाळण्यासाठी लोक डिजिटल पेमेंटवर अवलंबून होते. त्यामुळे भारतात होत असलेल्या डिजिटल पेमेंटचा वेग सातत्याने वाढत आहे.


एका अहवालानुसार, Google Pay, Paytm, Phone-Pe आणि BHIM App सारख्या इतर UPI प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला सुमारे 1.22 अब्ज म्हणजेच सुमारे 122 कोटी रुपयांचे व्यवहार होऊ लागले आहेत. दुसरीकडे, जर आपण 2016 मधील म्हणजेच 5 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची तुलना केली तर आता त्यात 550% वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये 1 हजार 4 कोटी डिजिटल व्यवहार झाले. 2020-2021 मध्ये हा आकडा 5 हजार 554 कोटींवर पोहोचला आहे. 2020 च्या तुलनेत एप्रिल-मे 2021 मध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.


UPI काय आहे


UPI, ज्याला आपण इंग्रजीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतो, ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे, जी मोबाईल अ‍ॅपद्वारे कार्य करते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी बँक खात्यात पैसे परत मिळतात.


तुम्ही UPI द्वारे बिले भरू शकता, ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता आणि नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा.