UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता `या` बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
UPI Payment Limit News : आज 10 रुपयासाठी ही आपण प्रत्येक जण UPI पेमेंटचा वापर करतो. आज मोठ्या दुकानांपासून साध्या चहाच्या टपरीवरही UPI वापर केला जातो. अशातच UPI पेमेंट चा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी मोठी बातमी आहे. रोज आपण दिवसातील छोटे मोठे व्यवहारात हे सर्रास UPI द्वारे करतो. कोरोनानंतर UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एका दिवसात तुम्ही किती पैसे हे UPI द्वारे ट्रान्सफर करु शकतो. खरं प्रत्येक बँकांची मर्यादा ही वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या बँकेतून पेमेंट करता त्यानुसार जाणून घ्या तुम्ही दिवसाला UPI द्वारे किती पेमेंट करु शकता ते. (UPI Payment Limit SBI ICICI HDFC Axis Bank transaction limit of how many payments per day in marathi )
कोणत्या बँकेची किती मर्यादा?
SBI, ICICI बँक आणि HDFC यासारख्या नावाजलेल्या बँकेतून मोठ्या प्रमाणात ग्राहक UPI पेमेंटचा वापर करतात. या सगळ्या बँकेच्या मर्यादा या वेगवेगळ्या आहेत.
SBI - UPI द्वारे दिवसाला 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येणार.
HDFC - UPI द्वारे दिवसाला 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येणार. पण नवीन ग्राहक असल्यास त्याला दिवसाला फक्त 5000 रुपयांचा व्यवहार करता येणार.
Axis Bank - UPI द्वारे दिवसाला 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येणार.
ICICI - UPI द्वारे दिवसाला ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार. तर Google Pay वरुन पेमेंटची मर्यादा 25,000 रुपये आहे.
बँक ऑफ बडोदा - दिवसाला 25,000 रुपयांपर्यंतचे पेमेंट ग्राहकांना करता येतील.
आरबीआयच्या नवीन योजनेमुळे ग्राहकांना फटका?
आरबीआय UPI पेमेंटसंदर्भात नवीन योजना आणण्याचा तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देशातील थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर (TPAP) ची व्हॉल्यूम कॅप 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा विचार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळल्यानंतर फोन पे, गुगल पे आणि पेटीएमदेखील पेमेंटची मर्यादा ठरवू शकणार आहेत. त्यामुळे जर हा प्रस्ताव मंजुर झाल्यास ग्राहकांना सर्वाधिक फटका आणि मानसिक त्रासाला समोरं जावं लागू शकतं.