ISRO PSLV-C37: चांद्रयान मोहिम, मिशन आदित्य एल1 या आणि अशा अनेक मोहिमांमुळं जागतिक स्तरावर इस्रोच्या कामगिरीचं कौतुक झालं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आजवर अनेक महत्त्वाच्या मोहिमा फत्ते करत या क्षेत्रात मैलाचे दगड प्रस्थापित केले. याच इस्रोच्या एका मोहिमेचं वर्तुळ पूर्ण झाल्याचं आता म्हटलं जात आहे. कारण ठरतंय ते म्हणजे थेट अवकाशातून पृथ्वीवर कोसळलेली एक वस्तू.  


थोडं मागे वळून पाहताना... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 फेब्रुवारी 2017 मध्ये इस्रोनं सतीश धवन स्पेस सेटंर इथून पहिल्यांदाच 104 सॅटेलाईट एकाच वेळी लाँच केले होते. यावेळी ही प्रक्रिया PSLV-C37 या रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आली होती. अवकाशात उपग्रहांना अपेक्षित स्थळी सोडल्यानंतर गे PS4 तिथंच घिरट्या घालत होतं. 


USSPACECOM रॉकेटच्या या भागाला ट्रॅक करत होतं. इस्रोच्याच माहितीनुसार रॉकेटचा हा भाग 470 X 474 किमी आकाराच्या एका अंडाकृती दिशेत फिरत असून, हळुहळू गुरूत्वाकर्षणामुळं पृथ्वीच्या दिशेनं खाली खाली येत होता. याचा एक आलेखसुद्धा जारी करण्यात आला. रॉकेटचा हाच भाग अखेर 6 ऑक्टोबर 2024 रोजी जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर पृथ्वीवर कोसळला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत हा भाग अटलांटिक महासागरात कोसळला. 


इस्रोनंही ठेवलेलं लक्ष 


इस्रोच्या सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्स मॅनेजमेंटनं सप्टेंबर महिन्यापासून या रॉकेवर नजर ठेवली होती. तो पृथ्वीवर कोसळण्याची वेळ, त्यामुळं होणारं नुकसान आणि इतर गोष्टींपासून बचाव करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. दरम्यान इस्रोच्या PSLV-C37  या मोहिमेमध्ये जवळपास 104 सॅटेलाईट लाँच करण्यात आले होते. याच मोहिमेचा भाग असणारा कार्टोसॅट भारतीय लष्कराच्या मदतील असल्याचंही सांगितलं जातं. 


हेसुद्धा वाचा : MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग... 



असं म्हणतात की, सर्जिकल आणि एअरस्ट्राईकमध्येही याची मदत घेण्यात आली होती. शिवाय चिनकडून घुसखोरी केली जात असतानाही त्याला चीनवर तैनात ठेवण्यात आलं होतं. कार्टोसॅट प्रणालीतील उपग्रह सहसा कार्टोग्राफी किंवा नकाशे बनवण्याचं काम करतात. पण, त्यांच्या मदतीनं पाळत ठेवणं, हेरगिरी करणं अशीही कामं केली जातात.