मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE Result 202) चा निकाल जाहीर केला. त्यामुळे युपीएससी टॉपरच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. परंतू एकच नावांमुळे काही उमेदवार गैरसमजाचे बळी ठरले आहेत. त्यांनी स्वतःला टॉपर समजले. त्यापैकी एक नाव दिव्या पांडे होय. ती झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. गैरसमजाचामुळे तिला घोर निराशेच्या गर्तेत ढकललं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्याने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अखिल भारतीय 323 रँक मिळवल्याबाबत सांगण्यात आले होते. पण तिचा दावा खोटा ठरला. खरं तर, जेव्हा सिव्हिल सर्व्हिसचा निकाल जाहीर झाला, तेव्हा दिव्याच्या मित्रांनी फोन केला आणि सांगितले की तिची रँक  323 वी आहे. यानंतर दिव्यांभोवती अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली.


इतकेच नाही तर सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडचे ​​सीएमडी, राजरप्पाचे जीएम, रामगडच्या जिल्हा आयुक्त माधवी मिश्रा यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिव्या पांडेचे अभिनंदन केले. मुलीच्या यशाबद्दल दिव्याच्या वडिलांचाही गौरव करण्यात आला. पण सत्य काही वेगळेच निघाले.


UPSC नागरी सेवा परीक्षेत 323 वा क्रमांक झारखंडच्या दिव्या पांडेला नाही तर तामिळनाडूची रहिवासी दिव्या पी होती. समान नाव आणि आडनावामुळे हा प्रकार गैरसमजातून झाला. दिव्याच्या वतीने सांगण्यात आले की ते सर्वजण निकाल तपासत होते. त्यावेळी वेबसाइट नीट काम करत नव्हती म्हणूनच त्यांनी त्यांच्या मित्रांवर विश्वास ठेवला आणि क्रॉस चेक केले नाही.


या घटनेनंतर दिव्या निराश झाली असून तिचे कुटुंबीयही निराश झाले आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितले की, तिच्याकडून चूक झाली असून त्यामुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागला. या चुकीबद्दल कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासन तसेच कंपनीची माफी मागितली आहे.