रामपूर : उत्तरप्रदेशामध्ये भिकारींच्या एका समुदयाने भीक म्हणून एक रूपयाचं नाणं घेण्यास नकार दिला आहे. एक रूपयाच्या नाण्याच्या आकारावरून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 



 नेमकं म्हणणं काय ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एका भिकारीने दिलेल्या माहितीनुसार ज्याप्रमाणे मागील वर्षी नरेंद्र मोदींनी  ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांवर बंदी घातली तसाच आम्ही आता एक रूपयाच्या नाण्यावर बहिष्कार घातला आहे. नव्या एक रूपयाच्या नाण्याचा आकार ५० पैशांप्रमाणे आहे. अनेक दुकानदार, रिक्षाचालक नाण्याचा आकार लहान असल्याने त्याचा स्वीकार करत नाहीत.  


 
 नोटाबंदीचा निर्णय   


 मागील वर्षी नोटाबंदी झाल्यानंतर ५०० आणि  १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यामुळे बॅंक आणि एटीएम सेंटर्सच्या बाहेर लांबच लांब रांग लागली होती.  
 
 मोदींनी नोटाबंदी करताना काळे धन बाहेर काढण्यासाठी, आतंकवाद्यांना पोहचवली जाणारी रसद रोखण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता.