उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : भाजपला भोपळा, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त
उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा जोरदार फज्जा उडाला. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जादू चाललीच नाही.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा जोरदार फज्जा उडाला. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जादू चाललीच नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात भाजपला भोपळाही फोडता आला नाही. पण, काँग्रेसलाही येथे जोरदार दणका बसला. इतका की, काँग्रेसला येथे अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
सपाची सायकल बसपच्या हत्तीच्या सहकार्याने जोरदार पळाली
उत्तर प्रदेशात सध्या नवे राजकीय समिकरण उदयास आले आहे. येथे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली आहे. या आघाडीचा परिणाम असा की, फुलपूर आणि गोरखपूर या दोन्ही मतदार संघात सपाची सायकल बसपच्या हत्तीच्या सहकार्याने जोरदार पळाली. इथे समाजवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडणून आले. भाजपला इथे आपेक्षा होती. पण, अपेक्षेप्रमाणे काहीच घडले नसल्याने भाजपला सत्ता असूनही येथे जोरदार आपटी खावी लागली. तर, त्या तूलनेत काँग्रेसची आवस्था तर, फारच दारूण झाली. काँग्रेस उमेदवाराला येथे आपली अनामत रक्कम वाचवता आले नाही.
मतदारसंघ निहाय मतांची आकडेवारी
फुलपूर मतदारसंघ
काँग्रेस - मनीष मिश्र (१९,३५३ मते)
समाजवादी पक्ष - नागेंद्र पटेल ( ३, ४२, ७९६ मते)
भाजप कौशलेंद्र पटेल २,८३,१८३ मते)
गोरखपूर मतदारसंघ
काँग्रेस - डॉक्टर सुरहिता करीम (१८,८५४ मते)
समाजवादी पक्ष - प्रविण निषद ( ४, ५६, ५१३ मते)
भाजप - उपेंद्र शुक्ल (२१ ८८१)