Crime News : आईच्या तब्येतीचं कारण देत एका तरुणीने डॉक्टरला (Doctor) घरी बोलवून हनीट्रॅपमध्ये (HoneyTrap) अडकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीकडून सातत्याने पैशांसाठी ब्लॅकमेल ( Blackmailing Case) केलं जात असल्याच्या धक्क्याने डॉक्टरचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 22 वर्षांच्या तरुणीला अटक केली आहे. उत्तरप्रदेशमधल्या सुभाषनगरमधली ही घटना आहे. या भागात एका डॉक्टराच दवाखाना होता. काही दिवसांपूर्वी या डॉक्टरला एक फोन आला. फोन करणाऱ्या तरुणीने आपण नर्सिंगचा कोर्स केला असून नोकरीची गरज असल्याचं त्या डॉक्टरला सांगितलं. पण डॉक्टरने सध्या जागा नसल्याचं तिला सांगत फोन कट केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच दिवशी ही तरुणी एका मैत्रिणीला घेऊन त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेली. तीने पुन्हा डॉक्टरकडे नोकरी देण्याची विनंत केली. आपली आर्थिक परिस्थिती ठिक नसून नोकरीची गरज असल्याचं तीने त्या डॉक्टरला सांगितलं. पण नोकरी देण्यास आपण असमर्थ असल्याचं त्या डॉक्टरने तरुणीला सांगितलं. डॉक्टरला घरी येऊन तपासणीची विनंती करत ती मुलगी रडू लागली. शेवटी डॉक्टरने घरी येण्याचं मान्य केलं. मुलीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. पण डॉक्टर घरी पोहोचताच मुलीने आपले सर्व कपडे उतरवले आणि डॉक्टरसोबर गैरवर्तन सुरु केलं. धक्कादायक म्हणजे घरात आधीच एक महिला आणि दोन पुरुश लपून बसले होते. या सर्वांनी डॉक्टरला पकडून त्याचे कपडे काढले. त्यानंतर डॉक्टरचे आणि त्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले. 


सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ
यानंतर त्या मुलीने आणि तिच्या साथीदारांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरु केला. अश्लील व्हिडिओ व्हारयर करण्याची धमकी देत त्या तरुणीने सुरुवातीला डॉक्टरकडून 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा एक लाख रुपये उकळले. ती तरुणी वेगवेगळा फोनवरुन फोन करत डॉक्टरला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. तसंच सातत्याने पैशांची मागणी केली जात होती. याचा प्रचंड धसका डॉक्टरने घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यावर संपूर्ण प्रकरण बाहेर आलं.


पोलिसांनी या प्रकरणी प्रिया गंगवार नावाच्या मुलीला अटक केली असून तिला गुन्हात मदत करणारी एक महिला आणि दोन तरुणांनाही अटक केली आहे. आरोपींच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रियाने केवळ डॉक्टरच नाही तर याआधी अशाचप्रकारे अनेकांना फसवलं होतं. यात एक भारतीय लष्कराचा जवान, आरटीओचा एक कर्मचारी तसंच इतर आठ लोकांना जवळपास सहा लाख रुपयांना लुटलं. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.