उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची सत्य परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Socail Media) व्हायरल होत आहे.  खड्डेमुक्त उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मोहिमेचा पर्दाफाश करणारा हा अपघात सीतापूर येथे घडला. सीतापूरमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे ( pothole) पडले असून त्यात पाणी तुंबले होते. जहांगीराबाद चौकाच्या या रस्त्यावरून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (VIP) ताफा जात होता. या ताफ्यात अनेक मोठे अधिकारी त्यांच्या महागड्या गाड्यांमध्ये होते. दरम्यान, ताफ्याच्या समोरून एक ई-रिक्षा (E-Rickshaw) या व्हीआयपी (VIP) ताफ्याला रस्ता देण्याच्या नादात उलटली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्याची बाब म्हणजे ई-रिक्षा उलटल्यानंतरही व्हीआयपींचा ताफा तसाच पुढे गेला आणि कोणीही वाहनातून खाली उतरून ई-रिक्षातील (E-Rickshaw) प्रवाशांची मदत केली नाही. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. त्यानंतर आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी ई-रिक्षा सरळ केली. 


माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना सोमवारी घडल्याचे समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महागड्या गाड्यांमधून जाताना अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसह उलटलेल्या ई-रिक्षाकडेही दुर्लक्ष केल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आजकाल सरकार ज्याप्रकारे रुपयाची घसरण होत आहे तशाच प्रकारे घसरलेल्या ई-रिक्षाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे लोकांनी म्हटलं आहे.


 




याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात खड्डेमुक्त अभियान राबवले जाईल असे सांगितले होते. यापूर्वी बलिया जिल्ह्यातूनही असाच एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये एक व्यक्ती या रिपोर्टलाा खराब झालेल्या रस्त्यांबद्दल सांगत होता. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती म्हणत होती की, रस्त्यावर बरेच खड्डे आहेत आणि त्यामुळे दररोज अनेक ई-रिक्षा उलटतात. तितक्यातच मागून येणारी रिक्षा खड्ड्यात उलटली होती. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.