लखनऊ : Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी 20 लाख तरुणांना रोजगारासह अनेक आश्वासने दिली. काँग्रेसचा युवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रियंका गांधी यांना यूपीमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा चेहरा दिसतो का?


प्रियंका यांनी दिले CM शर्यतीत असल्याचे संकेत  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही, परंतु त्यांनी स्वतःच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे सांगितले. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी त्यांना विचारले की यूपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका यांनी सांगितले की, 'तुम्हाला यूपीमध्ये दुसरा चेहरा दिसतो का? तुम्हीच सांगा तुम्हाला यूपीमध्ये कोणता चेहरा दिसत आहे.


काँग्रेसचा युवा जाहीरनामा प्रसिद्ध


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी दिल्लीत उत्तर प्रदेशसाठी युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने 20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. 8 लाख नोकऱ्या फक्त महिलांना दिल्या जातील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. 


प्रियंका गांधी विधानसभा निवडणूक लढवणार का?


यावेळी प्रियंका गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत कोणताही पुढे नाही असे प्रियंका म्हणाल्यात. त्यापुढे म्हणाल्या, ठरले तर तुम्हाला कळेल.


निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी करणार?


काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या आघाडीने सरकार स्थापन करण्याची परिस्थिती उद्भवल्यास त्यांचा पक्ष विचार करेल. यासोबतच काँग्रेस अशा आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यास तरुण आणि महिलांशी संबंधित त्यांचा अजेंडा राबविण्याची एक अट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


यूपीमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका 


 उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.  2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र लढले होते. समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत 311 जागा लढवल्या, तर मित्रपक्ष काँग्रेसने 114 जागांवर नशीब आजमावले. निवडणुकीत सपाला केवळ 47 जागा मिळाल्या आणि त्यांना 21.82 टक्के मते मिळाली. त्याच वेळी, काँग्रेसला केवळ 7 जागा जिंकता आल्या आणि त्यांना 6.25 टक्के मते मिळाली. 2017 मध्ये भाजपने 384 जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना 39.67 टक्के मते मिळाली होती.