Crime News : सुट्टीच्या दिवशी कंपनीच्या सुपरवायझरने तरूणीला कामावर बोलावूत घेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुपरवायझरने खाण्यामध्ये काहीतरी मिसळून तरुणीवर बेशुद्ध अवस्थेत बलात्कार केला. पीडित तरूणीने सुपरवायझरविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
28 ऑगस्टला तरूणीची सुट्टी होती त्या दिवशी सुपरवायझरने तिला फोन करत कामावर बोलावून घेतलं. फोन आल्यामुळे पीडित तरूणी कंपनीमध्ये जाते त्यावेळी तिथं फक्त 3 ते 4 लोकं उपस्थित होती. जेवणाची सुट्टी होते त्यावेळी होतो तेव्हा सर्वजण जेवण करून घेतात, मात्र यादरम्यान पीडितेच्या खाण्यामध्ये काहीतरी मिसळलेलं असतं. 


खाण्यात मिसळल्यामुळे तिला काही वेळाने चक्कर येते.  त्यानंतर सुपरवायझर लकी तिला कारखान्याच्या तळघरात नेतो आणि बलात्कार करतो. आरोपी लकी हा पीडितेवर बेशुद्ध अवस्थेत असताना बलात्कार करतो तिला जेव्हा जाग येते तेव्हा  कोणाला सांगू नको, असं म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी देतो.


पीडित तरूणी 2 दिवस सतत धक्क्यामध्ये होती मात्र शेवटी सर्व प्रकार आईला सांगते. त्यानंतर 31 तारखेला ती पोलिसात जाऊन आरोपी लकीविरोधात तक्रार दाखल करते. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून तपास सुरू आहे.  ही घटना उत्तर प्रदेशमधील साहिबाबदच्या इंडस्ट्रीअल परिसरातील आहे.