उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चंदौली (chanduali) जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी (DM) ईशा दोहन (Isha Duhan) या त्यांच्या थडाकेबाज वृत्तीसाठी ओळखल्या जातात. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्या लेडी सिंघमच्या (lady singham) भूमिकेत दिसत आहे. प्रत्यक्षात बांधकामाधीन इमारतीची (Building) पाहणी करण्यासाठी आलेल्या ईशा दुहान (Isha Duhan) यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य दिसले तेव्हा त्या चांगल्याच संतापल्या. (uttar pradesh lady singham chanduali dm ias isha duhan angry after seeing Bad Building Material)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदौलीच्या चकिया तहसील भागातील फिरोजपूर गावात आलेली ईशा दुहान बांधकामाधीन आयआयटी (IIT) इमारतीची अचानक पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. तेथे पोहोचताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ईशा दुहान बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की बांधकाम साहित्यात निकृष्ट दर्जाच्या विटांचा वापर केला जात आहे. हे पाहून त्या संतापल्या.


व्हिडिओ व्हायरल


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्या इमारतीच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या विटा उचलून दर्जा तपासत असल्याचे दिसून येते. त्यानंतर त्यांन या बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. 'जर येथे कोणी निकृष्ट दर्जाच्या वस्तू वापरताना आढळले तर मी तुमच्यावर आणि तुमच्या कंत्राटदारावर कारवाई करेन,' असे ईशा दुहान म्हणाल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना विटांचा दर्जा तपासून घेण्याचे आदेश दिले. 


निकृष्ट दर्जाच्या विटा पाहून जिल्हा दंडाधिकारी रागाने लाल झाल्या होत्या. विट हातात घेऊन दर्जा तपासताना त्या म्हणाले की, "पाहूनच असं वाटतय की ही निकृष्ट दर्जाची वीट आहे. इथे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाणार नाही. पुढेही असेच काही दिसून आले तर मी कोणालाच सोडणार नाही."



जिल्हा दंडाधिकारी ईशा दुहान यांनी सांगितले की, 26 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांनी फिरोजपूर, चकिया येथे निर्माणाधीन आयआयटी इमारतीची पाहणी केली होती. पाहणी केली असता काम अत्यंत संथगतीने सुरू असून तिथे कमी मजूर काम करताना आढळून आले. ईशा दोहन यांनी नाराजी व्यक्त करत बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवीधर असलेल्या ईशा दुहान यांनी 2014 मध्ये यूपीएससी (UPSC)परीक्षेत 59 वा क्रमांक मिळविला होता.