UP Viral News: भारत सरकार हर घर शौचालय ही योजना राबवत आहे. यासाठी शासनाकडून गरजू कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी मदतही दिली जाते. पण असं असताना उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील विचित्र आणि हस्यास्पद घटना समोर आली आहे. एका गावातील कारागिरांची कामगिरी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. बस्ती मुख्यालयापासून 20 किमी अंतरावर असलेल्या कुदर्हा ब्लॉक क्षेत्रातील गौराधुंधा गावात ग्राम प्रधान आणि सचिव यांनी एकाच टॉयलेटमध्ये दोन सीट बसवली आहेत. इतकंच काय तर त्या टॉयलेटला दरवाजाही लावलेला नाही. या टॉयलेटचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांना 'पंचायत' या वेब सीरिजचा आठवण झाली आहे. 


टॉयलेटसाठी आला इतका खर्च


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉयलेट बांधकामाची किंमत ऐकून पायाखालची जमिन सरकल्याशिवाय राहाणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार या टॉयलेटसाठी 10 लाख रुपये खर्च आला, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. या शौचालयाबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. दरवाजा नसलेले हे सार्वजनिक शौचालय कोणी बांधले, याचा उत्तर जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांकडून मागितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे जिल्हा पंचायत राज अधिकारी नम्रता शरण यांनी सांगितले. दुसरीकडे, जिल्हा दंडाधिकारी प्रियंका निरंजन यांनी सांगितले की, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.


बातमी वाचा- Viral Video : मगरीचा जबडा बर्फात गोठला, हातोडीने तरूणाने वाचवला जीव, पाहा VIDEO


सोशल मीडियावरील प्रतिक्रिया


टॉयलेटचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा फोटो पाहिला असून मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "हा जगातील आठवं आश्चर्य आहे. बांधकाम करणाऱ्या मजुरांचे हात..." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "हा फोटो पाहून पंचायत वेब सिरीजची आठवण आली. आता तर असंच म्हणावं लागेल, देख राहा है ना बिनोद"