मुंबई: लग्नाच्या वरातमध्ये घोडे उधळल्याचं ऐकलं असेल पण लग्नात हत्तीवरून वरात काढणं नवदेवाला मात्र चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण म्हणजे वरातीसाठी आणलेल्या हत्तीनं चांगलाच तांडव केला. रागाच्या भरात हत्तीनं संपूर्ण लग्न मंडपाची नासधूस केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतापलेल्या हत्तीनं लग्नमंडपात धुमाकूळ घातला. मंडप उद्ध्वस्त केलं इतकंच नाही तर गाड्यांचाही चुराडा केला. आपला जीव वाचवण्यासाठी नवरदेवानं लग्न मंडपातून धूम ठोकली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. हत्तीनं लग्नमंडपात लाखो रुपयांचं नुकसान केलं. 



 प्रयागराजमधील सराय इनायत पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या अल्मापूर गावत शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही मात्र हत्तीने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.


सराय इनायत पोलीस स्टेशनचे एसएचओ राकेश चौरसिया म्हणाले की, जेव्हा वराचे आणि त्याच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत होते आणि फटाके फोडले जात होते. या फटाक्यांच्या आवाजाने हत्ती बिथरला. सतत होणाऱ्या या आवाजाने तो संतापला आणि त्याने मंडपात दिसेल ते पायाखाली चिरडण्यास सुरुवात केली. .या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती सध्यातरी समोर आली नाही. मात्र या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.