`ज्यूसमध्ये थूंकला आणि...` फळविक्रेत्यानंतर आता ज्यूस विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार... Video व्हायरल
Viral Video : एका ज्यूस विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ज्यूस विक्रेता ज्यूस बनवताना त्यात चक्क थूंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे.
Viral Video : महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली इथल्या एका फळ विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हा विक्रेता एका पिशवीमध्ये लघूशंका करुन ती पिशवी त्याच हातगाडीवर ठेवत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लोढा पलावा इथला असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच आता उत्तर प्रदेशमधला आणखी एक किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ज्यूस विक्रेत्याचा व्हिडिओ
उत्तर प्रदेशमधल्या शामली (Shamli) इथल्या एका ज्यूस विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत एक ज्यूस विक्रेता ज्यूस बनवताना त्यात थूंकताना दिसतोय. शामली जनपद इथल्या फूल मार्केटमधला हा व्हिडिओ (spitting in juice) आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक विक्रेता ज्यूस बनवताना दिसतोय. ज्यूस बनवत असताना तो त्यात दोनवेळा थूंकताना दिसतोय. ज्यूस विक्रेत्याचा हा किळसवाणा प्रकार एका सजग नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या ज्यूस विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या ज्यूस विक्रेताला अटक केली असून त्याचं नाव आसिफ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आसिफने पोलिसांनी दिलेल्या जबाबात आपण थूंकत नव्हतो तर माशी बसत असल्याने तिला फंकू मारून हकलत होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे.
याआधीही किळसवाणे प्रकार
याआधीही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी उत्तर प्रदेशमल्या हापुड इथे एक विक्रेता लघवी मिसळून ज्यूस विकत असल्याचं समोर आलं होतं. तर रोट्या बनवताना आचारी त्यात थुंकत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. सलूनमध्ये दुकानदार ग्राहकाचं मसाज करताना थूकीचा वापर करत असल्याची घटनाही समोर आली होती.
विकृत मानसिकता
अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींना केळ अटक करुन चालणार नाही तर त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या घटनांनंतर जोर धरू लागली आहे.