मुझफ्फरनगर : UP Election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) राजकीय पक्ष युती करुन जास्तीत जास्त संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे (BKU) अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांची संघटना विधानसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देईल, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttar Pradesh  -  Union Minister and Muzaffarnagar MP Sanjeev Balyan met Bharatiya Kisan Union leader Naresh Tikiat at his residence)


केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांनी नरेश टिकैत  यांची भेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल (17 जानेवारी) केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांनी नरेश टिकैत (Naresh Tikait)यांची भेट घेतली. दोघांचा एकत्र बसलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र, याआधी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांनी बीकेयू अध्यक्ष नरेश टिकैत यांच्या घरी जाऊन त्यांची प्रकृती जाणून घेतल्याचे सांगण्यात आले. आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की भारतीय किसान युनियन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार का? 



पाठिंबा दिल्यावर नरेश टिकैत काय म्हणाले?


विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले की, माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. केंद्रीय मंत्री संजीव बल्यान हे माझ्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आले होते. सर्व पक्ष आमचा पाठिंबा मागायला येत आहेत. पण यावेळी आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही.


शेतकरी आंदोलनात बीकेयूची मोठी भूमिका


केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनात भारतीय किसान युनियनने मोठी भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्षाला शेतकऱ्यांना आपल्या गोटात आणायचे आहे. त्यासाठी पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. याआधी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टिकैत यांनी भेट घेतली होती.
 
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. यूपीमध्ये 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.