सलूनमध्ये थूंकी लावून करत होता ग्राहकांना मसाज, Video पाहून लोकांचा संताप
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलूमध्ये केशकर्तनकार चक्क आपल्या थुकीने ग्राहकांची मसाज करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी केली जात आहे.
Viral Video : सोशल मीडयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकांनी तरुणाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video) उत्तर प्रदेशमधला (Uttar Pradesh) असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओत एक तरुण आपल्या सलूनमध्ये आलेल्या ग्राहकांनी किळसवाणी सेवा देत असल्याचं उघडकीस आलं आहे. सलूनमधल्या एका ग्राहकाने हा आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांनी कारवाई मागणी केली आहे. (barber massaging customer by spitting)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
संताप आणणारा हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधल्या भवन पोलीस क्षेत्रातला आहे. इथल्या एका सलूममध्ये काम करणारा तरुण एका ग्राहकाला फेस मसाज करताना दिसत आहे. मसाज करत असताना हा तरुण क्रिम वापरण्याऐवजी आपल्या थूंकीने ग्राहकाच्या चेहऱ्याचा मसाज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी तरुण फरार झाल्याची माहिती मिळतेय. भवन इथल्या बस स्टॅंडजवळच्या सलूनमधला असल्याचं सांगितलं जातंय.
लोकांनी केली कारवाईची मागणी
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. ग्राहकांबरोबर असा किळसवाणा प्रकार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी संतप प्रतिक्रिया लोकं व्यक्त करतायत. शामली पोलीस याप्रकरणी अधिक तापस करत असून कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
गाझियाबादमध्ये तंदूरीवर थूंकण्याचा व्हिडिओ
याआधी उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमधल्या एका हॉटेलमध्ये एक तरुण तंदूरी रोटीवर थूंक लावून ती ग्राहकांना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली होती.