ऋषिकेष: घरातून निघालेली लोक आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचलीच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांच्या जीवालाही घोर लागला आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या 48 तासांत देहरादून इथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठे महापूर तर कुठे दरड कोसळणं तर कुठे पूल खचण्याच्या घटनांमुळे उत्तराखंडमधील नागरिक धास्तावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. मुसळधार पावसानं पूल खचला आणि गाड्या अडकल्या, दुर्घटनेची भीषणता दाखवणारे पाहा फोटो समोर आले आहेत. हे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. 


मुसळधार पावसामुळे देहरादून-ऋषिकेशला जोडणारा पूल खचला आणि मोठं नुकसान झालं आहे. या पुलावरून गाड्यांची वर्दळ होती. त्यामुळे पूल खचल्यानंतर काही गाड्या अडकल्या तर काही पाण्यातून वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेची भीषणता दाखवणारे फोटो समोर आले आहेत. 




मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या ठिकाणी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. तर मागच्या 48 तासांपासून उत्तराखंडमध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे.