Uttarakhand Chamoli Landslide Video : पावसाच्या दिवसांमधथ्ये दरड कोसळण्याची भीती अनेक भागांमध्ये असते. त्यातूनही डोंगराळ भागांमध्ये तुलनेनं हा धोका अधिक असतो. उत्तराखंडमध्ये सध्या अशीच थरकाप उडवणारी घटना घडली असून, या घटनेचा व्हिडीओ पोलीस यंत्रणेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. प्राथमिक माहितीनुसार उत्तराखंडच्या चमोली येथे बद्रिनाथ हायवे भागामध्ये असणाऱ्या पाताळगंगा इथं भूस्खलनाची घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घडनास्थळाची दृश्य इतकी विचलित करणार होती, की प्रत्यक्षदर्शींनी आपण साक्षात काळ पाहिल्याचं म्हटलं. प्रचंड आवाज होऊन एका क्षणात आसमंताला गवसणी घालणारा डोंगरकडा कधी खाली कोसळला हेच अनेकांच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर फक्त गोंधळ, भीतीपोटी फुटलेल्या किंकाळ्या आणि धुळीचे प्रचंड लोट इतकंच काय ते घटनास्थळी पाहायला मिळालं. डोंगरकडा कोसळून घडलेल्या या घटनेनंतर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि निसर्गाच्या या रौद्र रुपानं सर्वांना धडकी भरवली. 




हेसुद्धा वाचा : Joshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे


उत्तराखंडमध्ये तूफान पाऊस 


गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये तूफान पावसाला सुरुवात झाली असून, यामुळं इथं भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून भारताच्या उत्तरेकडे असणाऱ्या या पर्वतीय क्षेत्रांमध्ये पाऊस नवी संकटं उभी करताना दिसत आहे. सध्या घडलेली घटना पाहता उत्तराखंडमध्ये अशा परिस्थितीमुळं नेमकी संकटं कशी वेढा घालत असतील याच भीतीनं अनेकांचीच चिंता वाढली. NH-7 वर झालेल्या या भूस्खलनामुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 जोशीमठ बद्रीनाथ बंद करण्यात आला आहे. ज्यामुळं चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांनाही या संकटामुळं अडचणींचा सामना करावा लागलत आहे. सध्या महामार्गावर मातीच माती असून, पावसाचा जोर वाढल्यास येथील परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


यापूर्वी 9 जुलै रोजी जोशीमठ येथे बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर भयंकर भूस्खलनानं हाहाकार माजवला होता. डोंगराचा बहुतांश भाग खाली कोसळून थेट दरीच्या दिशेनं गेला होता. दरम्यान या सर्व घटना पाहता राज्यातील नागरिक आणि दाखल झालेल्या पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.