PAPER LEAK CASE: परीक्षेत पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी कॉपी करण्याचा मार्ग निवडतात. मात्र, उत्तराखंड सरकारने कॉपी करणाऱ्यांविरोधात  एकदम कडक शिक्षेची तरतूद केली आहे.  उत्तराखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधला कॉपी प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार केल्यास दहा कोटींचा दंड आणि थेट जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. या नियमामुळे कॉपी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत (Uttarakhand CM to introduce Anti-Copying Law). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास तुम्हाला जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड बसू शकतो. असा कायदाच बनवण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कठोर कायदा बनवण्यात आला. उत्तराखंड सरकारने स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी बनवलेला हा कायदा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 


प्रश्नपत्रिका छापण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत कोणीही गैरप्रकार केला तर त्यांना या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. शिवाय दोषी आढळल्यास त्याची मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. या कठोर कायद्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून, परीक्षेत कॉपी करण्याचा विचार विद्यार्थी करणार नाहीत.  उत्तराखंड लोकसेवा आयोगाने स्पर्ध परीक्षेत कॉपी करणाऱ्या 56 उमेदवारांची यादीच वेबसाईवर प्रसिद्ध केली आहे. 


प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल करणाऱ्यांवर  5 वर्षांची बंदी


महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल केली किंवा फॉरवर्ड केली किंवा परीक्षा देताना मित्राला मदत केलीत, तर थेट 5 वर्षांची बंदी लागू शकते. यापुढेही जर कोणी दोषी आढळलं तर फौजदारी गुन्हाही दाखल होणार आहे.  पेपरफुटीला आळा घालण्यासाठी बोर्डाने नियम कडक केले आहेत. बारावीच्या लेखी परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून, तर दहावी परीक्षेला 2 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र याआधीच परीक्षेचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत.  दरम्यान, एसएससी, एचएससीच्या प्रश्नपत्रिका दहा मिनिटं आधी वाचण्यास देण्याची सवलत रद्द करण्यात आली आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणामाची शक्यता असल्याची भिती शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली आहे.