मुंबई : उत्तराखंड प्रलयानं मोठा विध्वंस केला आहे. अनेक धरणं फुटली, अख्खाच्या अख्खा ऋषिगंगा उर्जा प्रकल्प वाहून गेला. हे नक्की नैसर्गिक संकट होतं की उत्तराखंड दुर्घटनेमागे चीनचा हात होता. याची चर्चा आता सुरू झाली आहे. उत्तराखंड दुर्घटनेमागे चीनचा हात? तर नाही ना? चीनचा वॉटर बॉम्ब हल्ला ? किंवा चीननं क्षेपणास्त्राचा मारा करुन हिमकडा पाडला ? असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवभूमीत असा हाहाःकार उडाला आणि पाहता पाहता देवभूमीत होत्याचं नव्हतं झालं. या प्रचंड विध्वंसामध्ये भारताचा ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प  पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळेच चीननंच हा हल्ला केला की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागलीय. दुर्घटना घडली त्या धौलीगंगा नदीचं उगमस्थान चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटला लागून आहे. या दुर्घटनेत हिमकडा तुटला त्यामुळे मोठ्या प्रलयानं या भागातली मोठमोठी धरणं खचली.  चीननं क्षेपणास्त्राचा मारा करुन हा हिमकडा पाडला की काय, अशीही शंका व्यक्त होत आहे. 



 उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ही दुर्घटना ज्या पद्धतीनं घडली, त्यावर संशय व्यक्त केला आहे. जोशीमठमधल्या रैनी गावातल्य उंच पर्वतांवर बरेच दिवस बर्फ पडत होता. त्यामुळे पर्वतांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला... हाच बर्फ कोसळला आणि ऋषी गंगा नदीमध्ये पडला. लाखो मेट्र्िक टन बर्फ नदीत पडल्यानं प्रलय आला. 


या भागातल्या पर्वतांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो... मग यंदाच का हिमकडा कोसळला, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच जोशी मठ आणि नंदादेवी ग्लेशियर यांच्यामध्ये जवळपास 1 हजार फुटांचं अंतर आहे, त्यामुळे हिमकडा तुटून एवढी मोठी दुर्घटना घडू शकते का, याबद्दलही वैज्ञानिक शंका व्यक्त करतायत... आता डीआरडीओचं एक पथक ही दुर्घटना कशी घडली, याचा तपास करतंय... लवकरच यामागे चीन आहे का, याचं सत्य बाहेर येणार आहे.