रेल्वेत सहाय्यक स्टेशन मास्तरच्या ५० हजार जागांची भरती
भारतीय रेल्वेमध्ये ५० हजार सहाय्यक स्टेशन मास्तरच्या जागा रिक्त आहेत.
नवी दिल्ली : रेल्वेमध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये ५० हजार सहाय्यक स्टेशन मास्तरच्या जागा रिक्त आहेत.
अद्याप रेल्वेतर्फे यासंबंधी अधिसूचना जारी केली नाही. पण लवकरच जारी करण्यात येणार आहे. indianrailways.gov.in या साईटवर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार अर्ज प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होणार आहे.
एकूण पद :
५० हजार रिक्त जागा
पदाचे नाव
सहाय्यक स्टेशन मास्तर
शैक्षणिक आर्हता
मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर डिग्री
वय मर्यादा
भरतीसाठी १८ ते ३२ वर्षाचे उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षण असलेल्या उमेदवारांना हे बंधन नसेल
निवड प्रक्रीया
पूर्व परीक्षा, इंटर्व्ह्यूतील परफॉर्मन्सच्या आधारावर निवड
पगार
५,२०० पासून ते २०,२०० पर्यंत पगार मिळू शकेल.