नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या भाज्यांच्या दरांमुळे अनेकांच्या घरचे मासिक बजेट कोलमडले आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी ८० रूपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या भाज्या चक्क ९० ते १०० रूपये किलो दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, विक्रेत्यांनाही माल कसा खपवायचा हा प्रश्न पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ कोणत्या एका राज्याचेच नव्हे तर, संबंध देशभरातील कमी-अधिक प्रमाणात संबंध देशातील सर्वच शहरांमध्ये हे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात ८० रूपयांना मिळणारा कोबी या महिन्यात प्रति किलो १०० तर, ५० रूपयांना मिळणारी शिमला मिर्ची प्रति किलो ७० रूपयांवर पोहोचली आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर व अवकाळी पडलेल्या पावसामुळे भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे बोलले जात आहे.


टोमॅटो, कांद्याच्या पुरवठ्यातही मोठी घट


अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे मोठ्या शहरांसह निमशहरांमध्येही टोमॅटो आणि कांद्यांच्या दरात घट झाली आहे. देशात २२ ऑक्टोबरला टोमॅटोची आवक ६० हजार टन इतकी झाली होती. तर, ही आवक एका हाप्त्यात २० हजार टनाने घटली आहे. कांद्याचे उत्पन्नही २१७ लाख टनाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. यंदा गेल्या वर्षी पेक्षा कांद्याचे उत्पाद यंदा ८ लाख टनांनी अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


का महागल्यात भाज्या


दक्षिण भारत, महाराष्ट्र आदि राज्यांमध्ये पडलेल्या अधिकच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर आणि भाज्यांच्या दरांवर मोठा परिणाम जाल्याचे सांगितले जात आहे. एनसीआर, मुंबई, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये भाज्यांच्या वाढत्या दराचा फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.