भाज्यांच्या दरात वाढ; टोमॅटोचा दर गगनाला भिडले
टोमॅटोच्या दरात भरपूर वाढ
मुंबई : भाज्यांच्या दरात तुफान वाढ झाली असून जेवणातून आता टोमॅटो आणि बटाटा हद्दपार झाला आहे. कांद्यासोबत अनेक भाज्या ताटातून गायब होण्याच्या तयारीत आहेत. टोमॅटोचा दर देशात ८० ते १०० रुपये इतका आहे. तर कांदा आणि बटाट्याचा दर ४० ते ५० रुपये इतका आहे. परतीच्या पावसाने भाज्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे.
कोलकाता टोमॅटो १०० रुपये दर
कोलकातामध्ये टोमॅटोचा दर १०० रुपये दर आहे. देशभरात अनेक ठिकाणी भाज्यांचा दर ६० ते ८० प्रति किलो असा आहे. कांदा आणि बटाट्यांचे दर देखील ५० रुपये प्रति किलो झाला आहे. दिल्लीत भाज्यांचे दर कडाडले आहेत. गाजीपुर भाजी मंडईत दर बदलले आहेत. टोमॅटोचा दर ६० रुपये किलो आहे. १३०० ते १४०० रुपये कॅरट मिळत आहे.
भाज्यांचे दर
- बटाट 40
- कांदा 40-50
- टोमॅटो 60-70
- फ्लॉवर 100
- शिमला मिर्च 80
- पडवल 80
- फरसबी 80
- भेंडी 50-60
- दोडका 40
- हिरवी मिरची 120-140
- लसून 150-160
- कोबी 80