गुवाहाटी : एकीकडे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक बिलावर लोकसभेत काल गदारोळ झाला. तर, दुसरीकडे देशातील अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला. आसाममध्ये विधेयकावरून जोरदार विरोध पाहायला मिळत असून बंद पाळण्यात आला आहे. आसाममध्ये 'नो कॅब' हे स्लोगन रस्त्यांवर भितींवर पाहायला मिळाले. विधेयकाविरोधात १६ संघटना सहभागी झाल्या असून, आसामबरोबरच लखनऊमध्येही त्याचा विरोध करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने आसाममध्ये बंद पाळण्यात येतोय. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनिअनच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारलाय. राजधानी गुवाहाटीमध्ये सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दिब्रुगडमध्ये रस्त्यावर टायर जाळून हिंसक आंदोलन सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थी देखील आक्रमक झाले असून हिंसक निदर्शने करत आहेत. तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरुन निदर्शनं करतायत. मोरिगावमध्ये देखील टायर जाळून आंदोलन सुरु केले आहे.


दरम्यान, लोकसभेत बहुमतानं मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधयेकाची आता राज्यसभेत कसोटी लागणार आहे. उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत भाजपाच्या सर्वात जास्त जागा असल्या तरी भाजपकडे स्वतंत्रपणे बहुमत नाही. मात्र एनडीएतल्या मित्रपक्षांच्या मदतीनं भाजप हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजपनं आपल्या सर्व खासदारांना आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहण्यासाठी व्हिप बजावला आहे.