नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रापती वेंकैया नायडू यांची फसवणूक झाल्याचा खुलासा त्यांना संसेदत केला आहे.


वेंकैया नायडूंची फसवणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भ्रमित करणाऱ्या जाहिरातींद्वारे अनेक कंपन्या लोकांची फसवणूक करतात. अशाच एका जाहिरातीने त्यांची फसवणूक केली आहे. वेंकैय्या नायडू यांना लठ्ठपणा कमी करण्याच्या नावाखाली फसवलं गेल्याचा खुलासा वेंकैय्या नायडू यांनी स्वत:च संसदेत केला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी शुक्रवारी चुकीचा जाहिरातींचा मुद्दा उचलला आणि या प्रकरणात स्पष्टीकरण मागितलं. 


कशी झाली फसवणूक


संबंधित खात्याचे मंत्री बोलण्याआधीच वेंकैया नायडू म्हणाले की, 'त्यांचे वजन आता कमी झाले आहे. पण एक दिवस त्यांनी एक जाहिरात पाहिली, ज्यामध्ये 28 दिवसांत वजन कमी करण्याचा दावा केला होता. कॅप्सूल खाल्ल्याने वजन कमी करण्याची ही जाहिरात होती. त्यांनी त्या जाहिरात साइटला भेट देऊन त्यांनी खरेदीची प्रक्रिया सुरु केली. प्रथम 150 रुपये देऊन कॅप्सूल मिळवता येईल. असं म्हटलं गेलं पण नंतर जेव्हा त्यांनी 150 रुपयांचं पेमेंट केलं तेव्हा संदेश आला की 1000 रुपये जमा केल्यावर अजून प्रभावी औषध मिळेल.'


कारवाईची केली मागणी


नायडू यांनी पुढे सांगितले की, 'जाहिरातीच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी आपल्या कर्मचार्यांमार्फत 1 हजार रुपये जमा केले. परंतु औषध मिळाले नाही. नायडू यांनी या जाहिरातीची तक्रार ग्राहक व संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली. या मंत्रालयाने उत्तर दिले की ही कंपनी भारतातून चालविली जात नाही. पण ती हाताळली जाते. ही गोष्ट सांगताना नायडू यांनी या मंत्रालयाचे मंत्री रामविलास पासवान यांना सांगितले की, त्यांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. जेणेकरून सर्वसाधारण ग्राहकांचे हित जपून ठेवता येईल.'